banner

Articles & Videos

Articles

आत्या माझी

आत्या माझी गुणी फार
खोटे बोलते वारंवार,
जग बनत चालले आळशी
पण खोट्या स्तुतीने, कुणीही पुसेल फरशी,
हेतू तिचा चांगला असतो
म्हणते “कामाने माणूस किती सुंदर दिसतो” !..... (१)

लक्षण तिचे आहे मोठे,
नाव मात्र जपते छोटे,
नावाची तिला गरजच नाही,
फक्त माऊलीचे काम करीत राही ....... (२)

सर्व तिचेच लेकरं बाळ,
कुणा न केलं तिने वेगळं,
कष्ट घेऊन मोठ केलं
एक एक बाळ श्रेष्ट बनलं.
अशा अनेक मूर्ती घडविल्या तिने,
असा संसार दिव्य केला तिने,
जो चार भिंती पुरता राहिला नाही
समाजच वर आणिला तिने ..... (३)

राहिली नाही समाजा पुरती,
किर्तन प्रवचन करायला लागली,
शेती वाडी पण पाहायला लागली,
वधू वरांच्या जोड्या लावीत सुटली;
पण गरज पडली तर
स्वतःची भाकरी करायची नाही सोडली ...... (४)

वहिनी वरती प्रिती फार,
वहिनी शिवाय नौका होत नाही पार.
वहिनीला कधी गुरु म्हणते,
तर कधी आई म्हणून वंदन करीते.
माहेरी आता सर्वांची आई,
गळा भेट करता करता डोळे भरून येई ......(५)

माऊली माऊली म्हणता हि माई
माऊली माऊली म्हणता हि माई,
गरज तिला कुणाची राहिली नाही,
स्वतःतीलच सापडली विठ्ठल रखुमाई
आता त्याच्याकडे जायची करू नकोस घाई. ..... (6)

मानसी सोसे, पुणे. (Oct 16 th, 2017)


<< back