banner

Articles & Videos

Articles

दहाचा नऊ होतो कसा?

दहाचा नऊ होतो कसा,
शब्द असाच बदलतो कसा ?

आत्म्याची किंमत राहिलीच नाही,
कागदाचा तुकडा सर्वस्व कसा ?
कागद हा प्रश्नाचं उत्तर,
का, उत्तराचा प्रश्न कागद कसा?

दहाचा नऊ होतो कसा,
शब्द असाच बदलतो कसा ? ………1

खरे उत्तर तर वरचा देतो.....
खरे उत्तर तर वरचा देतो.....
“काळ जाऊ द्या”, म्हणतो
“मग मीच बोलतो
मग मीच बोलतो,
नऊचा बारा होतो असा,
शब्द पुन्हा फिरतो कसा ! ………2

(Pune, Feb 2017)


<< back