banner

Articles & Videos

Articles

नारळाचे झाड

या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?
पाने बी हाय, डाली बी हाय
अन हाय यामध्ये लाटांची नांव
या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?

काय काय सांगू, कसं कसं सांगू ?
देवाची रूपे समदी पाय
देssवाची रूपे समदी पाय ……………..………..।।१।।

या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?
पाने बी हाय, डाली बी हाय
अन हाय यामध्ये लाटांची नांव
या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?

आम्ही जगात, आम्ही जगात
येतो नि जातो नि करतो काय ?
करतो काय काय कुणाला ठाय ?
बांधून ठेवतो आपले पाय …………………………..।।२।।

या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?
पाने बी हाय, डाली बी हाय
अन हाय यामध्ये लाटांची नांव
या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?

तुझी नि माझी, कशी हि जोडी ,
नारळा तू मला दे तुझी गोडी,
तुझ्या गोडीतून, भरारी घेईन,
उंच आकाशाला जाऊन बघीन …………………… ।।३।।

या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?
पाने बी हाय, डाली बी हाय
अन हाय यामध्ये लाटांची नांव
या नारळाच्या झाडामध्ये काय काय हाय ?

मानसी सोसे पुणे (December 2011)


<< back