banner

Articles & Videos

Articles

शिकता शिकता झाले ओझे

हं sss ओs म ss
शिकता शिकता झाले ओझे
शिक्षणाचे शिक्षणाचे,
उरले नाही वेड मजला
शालेयच्या अध्ययनाचे अध्ययनाचे.
शिकता शिकता झाले ओझे
शिक्षणाचे शिक्षणाचे !

उत्तीर्ण करा, मजला या
जीवनाच्या परीक्षेत परीक्षेत,
हात जोडोनी
जाता जाता, जाता जाता,
विनंती हि विनंती ही ……।।१।।

शिकता शिकता झाले ओझे
शिक्षणाचे शिक्षणाचे,
उरले नाही वेड मजला
शालेयच्या अध्ययनाचे अध्ययनाचे ।

कसे तारुण्य गेले, संसार केले,
कळले नाही, कळलेच नाही,
जीवनाच्या या गाडीने वेग
कसे धरले कसे धरले.

कुणी न अजुनी मज जाणियलें जाणियलें
कुणा न अजुनी मी जाणियलें जाणियलें.
जाणतो कोण कुणा,
कधी न कळले, कधी न कळले ………।।२।।

शिकता शिकता झाले ओझे
शिक्षणाचे शिक्षणाचे,
उरले नाही वेड मजला
शालेयच्या अध्ययनाचे अध्ययनाचे ।

शिकुनी आलो, जगात मी या
पाठ मायेचा, अन ममताचा ..... ममताचा .
माया दिली तर घेतली मी
झोळी भरूनी झोळी भरुनी,
नाही दिली तर, हसलो मी हसलो मी,
तरी कुशीत घेतले ..... मिठीत घेतले
अवघ्यांना अवघ्यांना.

हेचि जीवन हाचि संसार
विठ्ठला रे विठ्ठला रे.
क्षमा कर मजला, जर चुकलो मी,
माझ्या कर्माला, माझ्या कर्माला,
विठ्ठला रे विठ्ठला रे....... ।।३।।

बाळा काय उरले ....
बाळा काय उरले, तुला काय देऊ ?
पाठ शिकलासी तू, मायेचा ममतेचा.

आयुष्या मागे, आयुष्य जाते,
न शिकते हे, न कळते हे.
पण ऐक बाळा, हेचि सत्य ते,
प्रेम सत्य हे.
बाकी सर्व खोटे .....
मुखवटे रे.... मुखवटे रे,
शवा संगे जाते... शवा संगे जाते.

उरते सत्य एकच ते
मायेचे अन ममतेचे.
बाकी सर्व खोटे
मुखवटे रे.... मुखवटे रे

मानसी सोसे पुणे (dt. 25/09/2012)


<< back