banner

Articles & Videos

Articles

अथांग सागरा

अथांग सागरा
काय केलेस तू मला
काय केलेस तू मला !

विसरलो भान मी
विसरलो स्वतःला ,
काय केलेस तू मला !

तुझ्या थेंबातही तू अन तुझ्यातही थेंब
देहातही देव अन देवातही देह ….…..(1)

अथांग सागरा
काय केलेस तू मला
काय केलेस तू मला .

गोंधळलो मी, गडबडलो मी
तुझ्यासमोर बसून
कळवळलो मी ...... कळवळलो मी,
ढवळले आतील साचेबंद
पंख त्याला आता कुठून आणू ?
देतोस का सागरा
मला पंख जरा .... मला पंख जरा……... (2)

अथांग सागरा
काय केलेस तू मला
काय केलेस तू मला .

मोडून पडल्या जीवाला
आता उडव जरा, आता उडव जरा,
नाही आता बसवत
नाही आता राहवत ,
उड्डणांची वाट पाहतो
घेऊन chal ata घरी मला
दाखव रे वाट मला
दाखव रे वाट मला ………..… (3)

अथांग सागरा
काय केलेस तू मला
काय केलेस तू मला !

विसरलो भान मी
विसरलो स्वतःला ,
काय केलेस तू मला
काय केलेस तू मला !

मानसी सोसे Goa 25/11/2013


<< back